नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पाच बंधाऱ्यासाठी ३ कोटींचा निधी -आ.विजय औटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत मांडओहळ नदीवरील तीन व दरोडी चोंभूत नदीवरील दोन अशा एकूण पाच बंधाऱ्यांसाठी २ कोटी ८२ लाख ७५ हजार १५८ रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार विजय औटी यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मांडओहळ नदीवर कामटवाडी येथे बंधारा बांधण्यासाठी ५२ लाख ५४ हजार ९६३ रूपये मंजूर करण्यात आले असून, या बंधाऱ्यामुळे ३२ हेक्टर सिंचन होईल. याच नदीवर खडकवाडी येथील बंधाऱ्यासाठी ५० लाख ९७ हजार ५२३ रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे २१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तर २० हेक्टर सिंचन होणाऱ्या वारणवाडी येथील बंधाऱ्यासाठी ५० लाख १३ हजार ७१८ रूपये मंजूर झाले आहेत. 

दरोडी चोंभूत नदीवर अळकुटी येथील बंधाऱ्यासाठी ६५ लाख २९१ रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. याच नदीवर चोंभूत येथील बंधाऱ्यामुळे ४२ हेक्टर शेतीसाठी फायदा होइल. त्यासाठी ६२ लाख ८ हजार ६६३ रूपये मंजूर करण्यात आले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या पाचही बंधाऱ्यांसाठी जि.प.सदस्य काशिनाथ दाते तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी आ. औटी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आ.औटी यांनी जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी नागपूर अधिवेशनादरम्यान शिष्टाई केली होती. 

त्यांच्या प्रयत्नांना यश येउन पाचही प्रस्ताव मंजुर झाले. येत्या मे महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील असा विश्­वास लघुसिंचन जलसंधारण उपविभागाचे सहाययक अभियंता नंदेश कर्डीले यांनी व्यक्त केला.जलसंधारणाचे महत्व ओळखून आ.औटी गावोगावी बंधारे बांधण्यास प्राधान्य देत आहेत. 

यापूर्वीही विविध गावांमध्ये बंधारे तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणलोटाची अनेक कामे होउन तालुक्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जलसंधारणावर भर देउन शेती समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याबददल आ.औटी यांचे काशिनाथ दाते व रामदास भोसले यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.