..तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार - शंकरराव गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, पिकविम्याचे अनुदान आलेले नाही, कर्जमाफी झाली नाही, शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशातच वीज बिल थकबाकी वसुलीसाठी अधिकारी रोहित्र बंद करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. यापुढे रोहित्र जर अधिकाऱ्यांनी बंद केले तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, माजी आमदार शंकरराव गडाख यांनी घोडेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत गडाख म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. जिल्ह्यात पीक विम्याचे कोट्यावधी रुपये अनुदान मिळाले पण नेवाशासाठी अगदी तुटपुंजे अनुदान मिळाले.तालुक्यात घोडेगाव व नेवासा मिळून ४१ हजार कृषीपंपधारक शेतकरी आहेत.

कृषी संजीवनी योजनेत अनेक शेतकऱ्यांनी भाग घेऊन जवळपास ३ कोटी रुपये भरले आहेत तरीही लोकप्रतिनिधींनीचा वचक नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. मागील खरीप हंगाम पाण्याअभावी शेतकऱ्यांना घेता आला नाही. त्यामुळे बळीराजा अधिच अडचणीत असताना यावर्षी निसर्गाची कृपा असून देखील त्याला रब्बीचे पीक शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे घेता येत नाही. गेल्या महिन्यापासून तालुक्यातील जवळपास २५०च्यावर रोहित्र बंद झाल्यामुळे शेतक ऱ्यांची पिके तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचा व जनवरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अशा या नाजूक प्रसंगी महावितरणचे अधिकारी, शासन व लोकप्रतिनिधी हे मूग गिळून गप्प आहेत. या प्रश्नासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी समज देऊनही ते काही भूमिका घेत नाहीत. अधिकाऱ्यांना या सर्व परिस्थितीची कल्पना दिली परंतु अधिकाऱ्यांना शांततेत सांगितले तर कळत नसेल तर यापुढे नेवासा तालुक्यातील रोहित्र बंद केल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन काळे फासले जाईल, असाही इशारा गडाख यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.