बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक फरार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर फरार झाले आहेत. गुरुवारी पुण्यात डी. एस. कें.च्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जरोखे धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थात डी. एस. के. आणि त्यांच्या पत्नी हेमंती या बैठकीला गैरहजर होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
१ एप्रिल २०१८ पर्यंत मुदत कंपनीच्या इतर संचालकांनी पैसे परत करण्यासाठी वाढवून देण्याची मागणी गुंतवणुकदारांना केली आहे. पण आता डी. एस. कें.च्या शब्दावर विश्वास राहीला नसल्याने गुंतवणुकदारांनी ही मुदत देण्यास नकार देत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली. ही बैठक डीएसकेंच्या कंपनीचे संचालक आणि कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यानेआटोपती घ्यावी लागली. पैसे परत मिळत नसल्याने अनेक गुंतवणुकदार अक्षरश रडकुंडीला आल्याच यावेळी दिसून आले.

मुदत ठेवीखाली कर्जरोखे धारकांनी सहाशे कोटी ठेवले आहेत. ज्या जागा विकल्या जातील त्यापैकी चाळीस कोटी रक्कम राहणार आहे. मुदत ठेवधारकांनी पोलिसांशी संवाद सुरु ठेवावा, जेणेकरुन ती रक्कम वेळेवर मिळेल, असे रिअल इस्टेटचे अभ्यासक रवी करंदीकर यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.