जमिनी शेतकऱ्यांच्या, पण रक्‍कम भूमाफियांच्या नावावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्‍यातील सुपा औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू आहे. परंतु, जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहेत तो शेतकरी या मोबदल्यापासून कोसो दूर असून, त्याच्याऐवजी भूमाफियांच्या नावावरच लाखो रुपयांच्या रकमा जमा होत आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत शेतकऱ्यांनी पारनेर तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यासह न्यायालयात धाव घेऊन ही रक्‍कम मूळ शेतकऱ्यांच्या नावावर जमा करण्याची विनंती केली आहे. परंतु, कागदी घोडे नाचवून केवळ संमतीपत्र दिल्याचे कारण पुढे करून भूमाफियांच्या नावावर रकमा जमा केल्या जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ऍपवर याबाबत लेखी तक्रार करूनही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.

सुपा औद्योगिक वसाहतीसाठी पारनेर तालुक्‍यातील तीन गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. काही ठिकाणी त्रुटी असल्याने त्या मार्गी लावून लवकर त्यांनादेखील मोबदला दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

परंतु, काही शेतकऱ्यांच्या खोट्या संमतीपत्राच्या आधारावर भूमाफियांनी शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे. परंतु, त्यांना कोणीच दाद देत नसल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नाही. 

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना मूळ शेतकऱ्यांच्या नावावर रक्‍कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हा ही माझी नाही तर प्रांताधिकाऱ्यांची जबाबदारी असून त्यांनी ती कार्यवाही करावी, असे मत त्यांनी या शेतकऱ्यांकडे व्यक्‍त केले. तर, प्रांताधिकाऱ्यांनी ही जबाबदारी तहसीलदारांची असल्याचे सांगून या शेतकऱ्यांचा फुटबॉल केला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.