मोबाइल चोरी सापडणे झाले सोपे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरासह तालुक्‍यात मोबाइल चोरींचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ही चोरी शोधणे सोपे काम आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले मोबाइल चोरी गेल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मोबाइल चोरी पकडणे सर्वात सोपे आहे, असे सांगून सध्या आठवडेबाजारात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. वेळप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षकांनाही बंदोबस्तासाठी पाठविले जात आहे. लवकरच मोबाइल चोरांपासून सावध रहावे, अशा आशयाचे फ्लेक्‍स बोर्ड लावण्यात येणार आहेत. 

पोलीस गस्तीमध्ये याबाबत सूचना देण्यात येणार आहे. मोबाइलधारकांनी आपआपल्या मोबाइलचा आयएमई नंबर डायरीमध्ये लिहून ठेवावा. चोरी झाल्यास त्या नंबरहून मोबाइल शोधणे सोपे होत,. अशी पुस्तीही त्यांनी माहिती देताना जोडली. 

अकोले शहरात मोबाइल चोरीची तक्रार नोंदवली जात नसतानाही मोबाइल शोधून देण्यात पोलिसांना यश आले आहे. तरी मोबाइल चोरीची तक्रार नोंदविण्यात यावी, असे आवाहन शिळीमकर यांनी मोबाइलधारकांना केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.