मुलीची छेड काढणाऱ्या उच्चशिक्षित तरूणास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या दोन वर्षापासून मुलीची वारंवार छेडछाड काढत त्रास देणाऱ्या उच्चशिक्षित तरूणास तोफखाना पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथून ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका मुलीस फैजान कलीम बागवान (रा. धरती चौक, पारशा खुंट, नगर) हा सुमारे दोन वर्षापासून वारंवार छेडछाड करत त्रास देत होता. याप्रकरणी सदर मुलीने वारंवार कायदेशीर तक्रार दाखल करूनही हा प्रकार सुरूच होता. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
गुन्हा करत हा आरोपी ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. अखेर तांत्रिक तपास करून तो हडपसर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरिक्षक सुरेश सपकाळे यांचे नेतृत्वाखाली मंगळवार दि. १९ रोजी तोफखाना पोलिस स्टेशनचे पोसई संजयकुमार सोने, पोना दौंड, पोकॉ शिंदे, शेख जावेद, पो.कॉ., रोहकले, पोकॉ. बडे, पोकॉ. वाघचौरे पोकॉ. गुुंडू, पोकॉ. सोनटक्के, पो.कॉ. आरकल यांनी हडपसर परिसरात सतत १२ तास गल्ली बोळात शोध घेवून तो नामांकित कंपनीत मुलाखत देण्यास जात असताना त्यास जेरबंद केले. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुलीस वारंवार त्रास देण्यामागे त्याचा उद्देश, त्याला मिळणारे आर्थिक पाठबळ, त्याला सहकार्य करणारे व्यक्ती यांचा शोध पेालिस करत असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोसई संजयकुमार सोने करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.