महिला बचतगटांना ५ कोटींची कर्जरूपी मदत : आ. कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिलांना उद्योगधंद्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. पूर्वी महिला चूल व मूल पुरत्या मर्यादित होत्या. परंतु काळानुरूप बदल झाला पाहिजे. महिलांना आता राजकारणात ५०% आरक्षण देण्यात आले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी बचतगटांना ५ कोटी ११ लाख रुपये वाटण्याचे काम केले. आतापर्यंत ४१३ बचतगटातील २ हजार ५५५ महिलांना कर्जरूपी मदत केली आहे. महिला या पुरुषांपेक्षा प्रामाणिकपणे व्यवसाय करून कर्जफेड करतात. त्यामुळे जिल्हा बँकेने महिला बचतगटांना कर्ज देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.आ. शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील बाणेश्­वर संस्थेच्या महिला बचतगटांना ३२ लाखांचे मुद्रा लोन देण्यात आले. यावेळी आ. कर्डिले बोलत होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

प्रा. बेरड म्हणाले की, महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. महिलांना भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळते. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होईल. त्यामुळे देशही सक्षम होईल, असे सांगितले. पंधाडे म्हणाले की, नगर तालुक्याचे लढाऊ आमदार म्हणून शिवाजी कर्डिले यांची ख्याती आहे. 

गेली २५ वर्षे लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्­न सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे. महिलांना सक्षम करण्याकामी त्यांनी मोठी चांगली भूमिका बजावली आहे. बचतगटांना मिळणारे कर्ज त्यांनी वेळेवर फेडल्यास त्यांची पत वाढून यापुढील काळात त्यांना अधिक मोठ्या प्रमाणात कर्ज मिळू शकेल, त्यांची भरभराट होईल, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.