शिर्डी नगरपंचायतीला दणका व्यापारी संकुल पाडण्याचा हायकोर्टाचा आदेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर- मनमाड राज्यमार्गावरील शिर्डी नगरपंचायतीने बांधलेले व्यापारी संकुल पाडण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. न्या.एस.पी. देशमुख व न्या.संगीतराव एस. पाटील यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (दि.२०) या प्रकरणात सुनावणी झाली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या निकालामुळे नगरपरिषदेला मोठा दणका बसला आहे. शहर नियोजन विभागाच्या सहाय्यक संचालकांनी २००३ साली नगर परिषदेच्या जमिनीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. तरीही इमारतीचे दोन वर्षांनतर बांधकाम करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रस्तावित बांधकाम राज्य महामार्ग नियंत्रण रेषेच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत कमलाकर कोते यांनी २००५ साली बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. शिर्डी नगर परिषदेने स्वत:च नियम धाब्यावर बसविल्याचे पुरावे त्यांनी याचिकेसोबत जोडले होते. या महामार्गाची नियंत्रण व इमारत रेषेमधील भागाचा वापर, वाटप, विल्हेवाट आणि विक्री न करण्याचे अंतरिम आदेश नगरपरिषदेला व कंत्राटदाराला दिले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.