टोळीयुद्धातून शनिशिंगणापुरात गुंड गणेश भूतकरची सिनेस्टाईल हत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शनिशिंगणापूर येथे टोळीच्या अंतर्गत वादातून कुऱ्हाड व तलवारीने वार करून कुख्यात गुंड गणेश भूतकर याची लोकांसमोर सिनेस्टाईल हत्या करण्यात आली. बुधवारी सायंकाळी भूतकर याच्या हाँटेलसमोर हा थरार घडला. मित्रानेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शनिशिंगणापूर येथील शिवाजंलीसमोर सायंकाळी वाद झाला होता. त्यातून अविनाश चांगदेव बनकर, मयुर हरकल, लखन नामदेव ढगे, अर्जून सुरेश महाले या गुंडांनी भूतकरच्या डोक्यावर कुऱ्हाड व तलवारीने वार करून त्याची हत्या केली. भूतकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेनंतर शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनचे पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.