नगर-दौंड रोडवरील वृक्ष तोडण्यास शिवसेनेचा विरोध

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर - दौंड ते थेट बारामती रस्ता रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून, पहिल्या स्तरावर नगर-दौंड रोडवरील वृक्ष तोडण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, हे काम नियमानुसार नसून अगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवा, मगच वृक्ष तोडून देऊ अशी भूमिका जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेनेचे नगर तालुकाध्यक्ष संदेश कार्ले यांनी घेतली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगर-दौंड रोडवरील अरणगाव व खंडाळा शिवारातील मोठमोठी वृक्ष तोडण्यात आली आहे. याबाबत कार्ले यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. रस्ता रुंदीकरणास अथवा रस्त्याच्या दुरुस्तीस आपला अजिबात विरोध नाही. मात्र, नियमाप्रमाणे वृक्ष तोडपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे महत्वाचे आहे.

नगर-दौंड रोडवर सध्या प्रचंड खड्डे आहेत. दीड ते दोन फुटाचे खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अनेकांचा अपघातात बळीही गेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीस मोठा कालावधी लागणार आहे. म्हणूनच सध्या प्राधान्याने रस्त्यावरील खड्डे बुजविणे महत्वाचे आहे. वास्तविक पाहता खड्डे बुजविल्यानंतरच वृक्ष तोड व्हायला हवी. तसे न करता थेट वृक्षतोड होत आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
खड्डे बुजविण्याबाबत श्री. कार्ले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीबाबत आमचा अजिबात आक्षेप नाही. मात्र, ही कामे नियमानुसारच व्हायला हवे असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ठणकावून सांगितले. याबाबत वेळप्रसंगी आंदोलनही छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.