मिरजगाव ग्रामपंचायत कार्यालयात चोरीचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मिरजगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या काचा फोडून चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांपैकी दिगांबर किसन ससाणे (रा.वाटलूज ता. दौंड) याला ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरूवार दि.३० रोजी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. 

मिरजगाव येथील क्रांती चौकामध्ये कायम रहदारी असलेल्या रस्त्यावरील मिरजगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय. या इमारती मधील ग्रामपंचायत कार्यालयात रात्री १० : ३० वाजेच्या दरम्यान दोन ते तीनजण असलेल्या चोरांनी ग्रामसचिवालयाच्या खालील गेटमधून प्रवेश केला. ग्रामसचिवालयाच्या इमारतीत घुसलेल्या या चोरांनी कटावणीच्या सहाय्याने ग्रामसचिवालयामधील ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरवाजा तुटत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा लोखंडी पहारीने फोडल्या. मात्र याच वेळी नेहमीप्रमाणे ग्रामसचिवालयाच्या इमारती पासून जात असलेल्या एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला या फोडलेल्या काचांचा आवाज ऐकू आला. त्याला ग्रामसचिवालयात काहीतरी झाल्याचे लक्षात आल्याने ग्रामसचिवालयाच्या इमारतीकडे धाव घेतली. .

यावेळी ग्रामसचिवालयात चोरटे असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने आपल्या सहकारी, मित्रांना मोबाईल फोन करून बोलावून घेतले. ही मंडळी यावेळी ग्रामसचिवालयाकडे निघाली असता. चोरांना आपल्याकडे कोणीतरी येत असल्याचे चाहूल लागल्याने त्यांनी येथून पळ काढला. पळत असलेल्या या चोरांपैकी एकाला पकडण्यात येथील ग्रामस्थांना यश आले. 

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव दिगांबर किसन ससाणे (रा.वाटलूज ता. दौंड) असे सांगितले. ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस हे.कॉ.सुरेश बाबर, दत्तात्रय कासार यांनी त्यास ताब्यात घेतले. ग्रामसचिवालयात आलेले बाकी इतर चोर येथील सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी सरपंच नितीन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे हे तात्काळ या ठिकाणी आले. मिरजगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीत अनेक दुकाने असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळच सहकारी पतसंस्था तसेच बँक ऑफ महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. यावेळी इमारतीत घुसलेल्या १८ ते २० वयोगटातील चोरांनी आपल्या तोंडाला बुरखा बांधला होता.

लोखंडी पहार, कटावणी आदी सशस्त्र असलेल्या या चोरांना नेमका बँक फोडण्याचा प्रयत्न होता का? ग्रामपंचायत कार्यालय याबाबत अद्यापी काही कळले नसून, ग्रामस्थांनी पकडून दिलेला चोर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर भिगवण येथील पोलिसात अनेक गुन्हे आहेत.पकडण्यात आलेल्या चोराविरूध्द मिरजगाव ग्रामपंचायतीने कर्जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.