श्रीरामपूरच्या रस्त्याच्या तक्रारीची पंतप्रधानांनी घेतली दखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वेळोवेळी रस्त्याच्या कामाबाबत संबंधीत विभागाकडे तक्रारी करुन देखील काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे वैतागलेल्या एका सुजान ग्रामस्थाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पत्राची तातडीने दखल घेत संबंधित विभागाला रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील शेलार वस्ती ते म्हसे वस्ती ३ कि.मी., शेलार वस्ती ते गोसावी गुरुजी ४ कि.मी., काळे भांड वस्ती ते मुसमाडे वस्ती १ कि.मी. असा एकूण आठ किलोमीटर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करावे याकरिता येथील सामाजिक कार्यकर्ते महेश अशोक गागरे यांनी स्थानिक ग्रामपंचायतीपासून ते संबंधित विभागाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु, सर्वांनीच त्याला केराची टोपली दाखविली.

वास्तविक गागरे यांनी दुरुस्तीची मागणी केलेला हा रस्ता लगतच्या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. चांदेगाव ते ब्राह्मणगाव शिवरस्ता, बेलापूर खुर्द शिवरस्ता अंतर्गत बोधेगाव ते ब्राह्मणगाव शिवरस्ता अशा रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असूनही या रस्त्याच्या कामाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अनेक शाळकरी मुलांना दररोज ठेचा खात या रस्त्याने जावे लागते. एखादा रुग्ण नेण्याची वेळ आली, तर मोटारसायकलशिवाय पर्यायच नसतो. कारण चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाणेच अवघड आहे. पावसाळ्यात येथील नागरिकांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे गागरे यांनी वेळोवेळी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी केल्या. 

परंतु, त्या तक्रारीची कुणीच दखल न घेतल्यामुळे गागरे यांनी धडक पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार केली. पंतप्रधानांनी त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेवून संबंधित विभागाला रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.