पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात जिल्हा परिषद जाणार उच्च न्यायालयात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषदेच्या हक्‍काचा 5054 या लेखाशीर्षाखालील रस्ते विकासचा निधी देण्यास टाळाटाळ करून तो परस्पर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा घाट घालणाऱ्या पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरम्यान, पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून 5054 च्या निधी वाटपासाठी 60-40 या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्यासमोर ठेवला आहे. परंतु, सदस्यांना तो अमान्य असून संपूर्ण निधी जिल्हा परिषदेला मिळावा अशीच भूमिका सदस्यांनी घेतली आहे. पालकमंत्री 60-40 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याने सदस्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सन 2016 ऑक्‍टोबरमध्ये ग्रामविकास खात्याने काढलेल्या अध्यादेशानुसार 5054 चा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु, गेल्या वर्षी हा निधी जिल्हा परिषदेला न देता परस्पर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पालकमंत्र्यांनी वर्ग केला होता. तेव्हादेखील जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या निधीची मागणी करूनही 26 कोटी देण्यास टाळले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.