श्रीगोंद्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होणार - माजी मंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-श्रीगोंदा तालुक्यात कृषी महाविद्यालय होणार असल्याच्या निर्णयाला राज्य मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे पण या महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद होण्याची गरज आहे म्हणून राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नुकतीच नागपूर येथे भेट घेतली असता कृषी मंत्री फुंडकर यांनी अधिवेशन संपल्यावर निधीची उपलब्धता करू असे आश्वासन दिले असल्याचे माजी मंत्री पाचपुते यांनी सांगीतले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
श्रीगोंदा तालुक्यात अनेक दिवसापासून कृषी महाविद्यालय होण्यासाठी तरुणाची मागणी होत आहेच व वेगवेगळ्या माध्यमातून चर्चीला जात आहे त्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे या महाविद्यालयाचा पाठपुरावा केला होता.

त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पथकाने श्रीगोंदा येथील शासकीय जागेची पाहणी करून शासनाला श्रीगोंद्यात महाविद्यालय होण्यास हरकत नसल्याबाबत प्रस्थाव पाठवला होता पण मध्यंतरी हे महाविद्यालय हळगाव ता ,जामखेड येथे होण्यास मंजुरी भेटली पण श्रीगोंद्यातील काही जण उच्च न्यायालयात गेले व त्यांनी हे महाविद्यालय श्रीगोंद्यात होण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले.

त्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुन्हा पाठपुरावा केला पण हळगाव साठी स्वतंत्र महाविद्यालय देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे त्यामुळे हे महाविद्यालय श्रीगोंदा येथे होणे कसे गरजेचे आहे हे मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगीतले .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयास मंत्री मंडळ बैठकीत मंजुरी दिली पण या महाविद्यालयाला आर्थिक तरतुदीची गरज असल्यामुळे नुकतीच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेतली व या महाविद्यालयाला तात्काळ निधी द्यावा व हे महाविद्यालय सुरु करावे अशी मागणी केली 

राज्याचे कृषी मंत्री फुंडकर यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यावर या महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले असल्यामुळे श्रीगोंद्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

लवकरच कृषी महाविद्यालय सुरु होणार - माजी मंत्री पाचपुते 
श्रीगोंदा येथील कृषी महाविद्यालयास राज्य मंत्री मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे पण हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज असल्यामुळे मी राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेतली व हिवाळी अधिवेशन संपल्यावर या महाविद्यालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे श्रीगोंद्यात लवकरच महाविद्यालय सुरु होईल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.