शाळांचे थकित विज बील भरणार शिक्षण विभाग शिक्षण मंत्र्यांची घोषणा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपुर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरीस कॉलेज) येथे संयुक्त बैठक घेवून मराठी शाळांच्या थकित विज बिला संदर्भात तोडगा काढला. शिक्षण विभागा कडून महावितरणला 40 कोटी देवून शाळांचे थकित वीज बील माफ करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच शिक्षण मंत्री व ऊर्जा मंत्री यांनी राज्यातील मराठी शाळा सोलर युक्त करुन, शासकिय शाळा व रुग्णालयांना घरगुती दरापेक्षा कमी दर आकारण्याचे आश्‍वासन दिले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटलायझेशनचा वापर होत आहे. यासाठी वीजेचा वापर होत असताना शाळांना महावितरण कडून व्यावसायिक दराने वीज आकारली जात आहे. शाळांना ते परवडत नसल्याने अनेक शाळांचे वीज बील थकल्याने त्यांची वीज महावितरण कडून कापण्यात आली. या प्रश्‍नावर शिक्षक परिषदेने आवाज उठवून पाठपुरावा केला असता नागपूरला ही संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. 

यावेळी शालेय शिक्षण मंत्री तावडे, ऊर्जामंत्री बावनकुळे, ऊर्जा विभागाचे सचिव, शिक्षण विभागाचे सचिव, महावितरणचे सर्व अधिकारी, विभागीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, राज्य कार्याध्यक्ष सुनिल पाटील, नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, सुभाष गोतमारे, जुगलकिशोर बोरकर, भरत मडके आदि पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकित राज्यातील 20 हजार 233 जि.प. शाळा व मान्यता प्राप्त शाळा या सोलरयुक्त करण्यासाठी येत्या दोन वर्षात हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 500 कोटींची तरतुद केली जाणार आहे. सोलर शाळा करणारी एजन्सी शाळेतील सोलर 15 वर्ष देखभाल दुरुस्तीची सेवा देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मार्च 2018 अधिवेशना पर्यंन्त प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गांत एक पंखा, दोन लाईट व एक डिजिटल सिस्टम वापरता येईल याकरिता राज्यभर किती निधी व किती साहित्य लागेल? 

याबाबतीत नियोजन करण्याचे सुचना करण्यात आल्या. राज्यातील जवळपास 7 हजार शाळांचे विज बिलं न भरल्याने कनेक्शन कापण्यात आले असून, याबाबतीत ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी खेद व्यक्त केला. याकरिता अंदाजे 40 कोटींची थकित रक्कम शिक्षण विभाग सरळ महावितरणाला देवून सदर शाळांचे थकित विज बील माफ करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्हात शाळांना विज बीलात व्यावसायीक दर लावला जातो. यावर तोडगा काढून शासकिय शाळा व रूग्णालयांना घरगुती दरापेक्षा कमी दर लावण्याचे आश्‍वासन या बैठकित देण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.