वीज कंपनीकडून महापालिकेला नाताळ भेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेकडे पथदिवे तसेच व्यावसायिक आकारणीची सुमारे ११ कोटी रुपयांची वीजबिले थकीत आहेत. त्यातील ७३ लाख ५४ हजार ४२१ रुपयांच्या वीजबिलासंदर्भात महापालिकेच्या तक्रारीनंतर महावितरणाने हे वीजबिल कमी केले आहे. हे वीजबिल कमी होणे म्हणजे महावितरणकडून महापालिकाला नाताळ भेट असे म्हटले जात आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महापालिकेची महावितरणकडे पथदिवे व व्यापारी स्वरूपाची ११ कोटी रुपयांची वीजबिले बऱ्याच वर्षांपासून थकबाकी होती. काही दिवसांपूर्वी महावितरणने त्यासाठी वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. महापालिकेतील विरोधीपक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांना निवेदन देऊन मीटर नादुरूस्त असल्याची तक्रार केली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मीटर नादुरूस्त असल्याने वीजबिल सरासरीने आकारले जात आहे. ट्रॅफिक सिग्नललाही व्यावसायिक दर आकारला जात आहे, असे बोराटे यांनी सांगितले होते. त्याची दखल घेत महावितरणने या चौकशीसाठी कक्ष अधिकारी नियुक्­त केले होते. त्यानंतर महावितरणने महापालिकेचे सुमारे ७३ लाख ५४ हजार ४२१ रुपये वीजबिल कमी केले आहे. यात उपविभाग दोन मधील ५४ लाख पाच हजार रुपये तर उर्वरित रक्­कम उपविभाग एक मधील आहे, अशी माहिती महावितरणचे वित्त व लेखा व्यवस्थापक विश्­वनाथ निर्वाण यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.