कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर डिझेल चोरट्यांचा उच्छाद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डीच्या सुरक्षेच्या नावाखाली नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहने कोपरगाव-रांजणगाव देशमुख-संगमनेर रस्त्यावरून वळविण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालक पेट्रोल पंप, हॉटेल अथवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. याचा फायदा घेत उभ्या वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्यांनी या परिसरात उच्छाद मांडला असून परप्रांतीय वाहनचालक त्यामुळे हैराण झाले आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलीसांची झजंट नको म्हणून तक्रार दाखल केल्या जात नसल्याने या चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.रात्रंदिवस गाडी चालवून पोटाला चिमटा घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या गाडीचालकांची डिझेल चोरी व मालकाकडून होणाऱ्या वसुलीच्या भुर्दंडामुळे गरीब गाडीचालकांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडत आहे..

विनासायास रात्रीतुन हजारो रुपयांची कमाई होत असल्याने डिझेल चोरणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत झाल्या असून रातोरात अनेक वाहनांचे डिझेल लंपास केले जात आहे. या प्रकारामुळे परप्रांतीय वाहनचालक धास्तावलेले आहेत. त्यांना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही काळ आराम करण्याच्या उद्देशाने वाहन पेट्रोल पंप, हॉटेल अथवा रस्त्याच्या कडेला उभे केले जाते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्याचा गैरफायदा घेत चोरटे चारचाकी वाहनांतुन येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या वाहनांच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून टाकीत पाईप टाकून काही मिनिटांत डिझेलच्या टाकीतील डिझेल ड्रम मध्ये भरून घेवून हे डिझेल चोर गायब होतात. वाहनचालक जर जागा झालाच तर त्याला चोप देण्याच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे वाहनचालक चांगलेलच धास्तावलेले आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.