राहत्या घरात गळफास घेवून तरूणाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील गणेश बाळकृष्ण चाबुकस्वार (वय-३८) यांनी आपल्याच राहत्या घरातील आढ्याच्या लाकडाला कपड्याच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या पुर्वी घडली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमगाव भोजापूर याठिकाणी गणेश चाबुकस्वार हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी सकाळी आपल्याच राहत्या घरात त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लहानु चाबुकस्वार यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.बी.खान करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.