पाथर्डीतील दोन गटातील मारामारीत एक जण जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी शहरातील बाजारतळावर झालेल्या दोन गटातील मारामारीत एक जण जखमी झाला असून यावेळी एका गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर दुसऱ्या गटाचे युवक पळत सुटले. दोन्ही गटातील काही युवकांनी सामजस्यांची भुमिका घेतल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी जमाव पांगविला. शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भाजीबाजर परीसरात लहान मुलगा पंतग उडवीत होता. पंतग उडविताना आडवा आल्याच्या कारणावरुन शिरसाटवाडी येथील एका युवकाची व एका युवक नेत्याची बाचाबाची झाली. याचे पर्यसवन नंतर मारामारीत झाले. 

तेव्हा तेथील काहींनी सोडवा-सोडव केली. त्यानंतर एका जेष्ठाने दोन्ही बाजुंच्या युवकांना समजावुन सांगितले. याच दरम्यान एकाने युवकाला मारहान केली. त्यांनतर पुन्हा काही युवक धावले व ते शिरसाटवाडी येथील युवकांच्या पाठीमागे पळाले. यावेळी एका व्यक्तीच्या डोक्यावर कुणीतरी अज्ञात युवकाने कशाने तरी मारल्यामुळे ते रक्तभंबाळ झाले. त्यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पोलिस अधिकारी व कर्मचारी बाजार तळावर आले. त्यांनी दोन्ही बाजुच्या जमावाला पांगविले. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला आहे. याप्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार दाखल केली नाही. शहरात तणावाचे वातावरण होते, मात्र दोन्ही बाजूच्या प्रमुखांनी मिटवामिटवी केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.