जि. प. ची सभा आरोग्य केंद्रांच्या मुद्यावरुन गाजली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील आरोग्य केंद्राचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. सभेचे कामकाज लवकर आटोपल्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्हा परिषदेची सभा अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती उमेश परहर, अनुराधा नागवडे, कैलास वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपप्रमुख कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विशेष सभेत २० विषयांवर चर्चा ठेवण्यात आली होती. सुरुवातीला आरोग्य विभागाचा विषय असल्याने सदस्य वाकचौरे यांनी ग्रामिण भागात आरोग्य सुविधा मिळत नाहीत अनेक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे ही बाब लक्षात आणून दिली तर सदस्या हर्षदा काकडे यांनी ढोरजळगाव येथील आरोग्य केंद्रासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावर प्रशासनाने काय भूमिका घेतली असा प्रश्न उपस्थित केल्यावर संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. तुम्ही कारवाई का करत नाही असा सवाल त्यांनी करून लवकरात लवकर कारवाई करा असे सांगितले. अनेक सदस्यांनी ग्रामीण भागातील रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. 

त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. अनेक दवाखाने ओस पडत चालले आहे. याचा गांभिर्याने प्रशासनाने विचार करावा अशी भूमिका मांडली. हा विषय लांबत चालल्याने अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सर्व बाबींचा विचार केला जाईल, मला दुसरा कार्यक्रम असल्यामुळे इतर प्रश्नावर चर्चा होणार नाही असे सांगून त्यांनी उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्याकडे पद्भार दिला. 

यानंतर जालिंदर वाकचौरे यांनी विशेष सभा घेतली जाते यामध्ये जर चर्चाच करायची नसेल तर उपयोग काय, आम्हाला प्रश्न मांडू दिले जात नाही, बोलू दिले जात नाही, एक प्रकारे मनमानी पद्धतीचा कारभार सुरू आहे असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केला. यावर उपाध्यक्षा घुले यांनी तुम्ही चर्चा करा पण याची इतिवृत्तात नोंद घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर काही काळ विविध विषयांसदर्भात चर्चा सुरू असतानाच घुले यांनी चर्चा थांबवून बैठक संपल्याचे जाहीर केले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.