मसुरीतील प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी महाजन पुन्हा रुजू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जिल्हाधिकारी अभय महाजन हे एक महिन्यातील प्रशिक्षणासाठी मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रबोधिनीतील प्रशिक्षण आटोपून रविवारी परतले आहेत. महाजन यांनी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजित माने यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारत कामकाजास प्रारंभ करून पुन्हा रुजू झाले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महाजन हे 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी कवडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून अभय महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची एप्रिल 2017 मध्ये पदोन्नती झाली.

महाजन यांनी 2 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हाधिकारी महाजन यांना आयएएस संवर्गात पदोन्नती मिळाल्यानंतर मागील महिन्यात भारतीय प्रशासकीय सेवेच्या मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी मागील महिन्यात रवाना झाले होते. महाजन यांनी रवाना होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली होती. 

महाजन यांची “फेज-थ्री’ प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. महाजन यांच्या समवेत देशभरातील 86, तर महाराष्ट्रातील 16 आयएएस संवर्गातील अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणात समावेश होता. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम मसुरी येथील विश्‍वविख्यात लालबहादूर शास्त्री प्रबोधिनीत केले जाते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

जानेवारीअखेर सुरू होणार जलयुक्त ची कामे

जलयुक्त शिवार अभियानात गावांचे शिवार जलसंपन्न करण्याच्या उद्देशाने सव्वादोनशे कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचा आराखडा बनविण्यात आला आहे. जिल्ह्यातील 241 गावांचा समावेश “जलयुक्त’मध्ये करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे स्थानिक गावकऱ्यांच्या सूचना व पाणलोट क्षेत्राचा विचार करून शास्त्रोक्त पध्दतीने निश्‍चित करण्यात आली आहेत. सध्या शेत शिवारात पिके उभी असल्याने काम करणे शक्‍य नाही. जानेवारी अखेरीस “जलयुक्त’ची कामे सुरू होतील. जल व मृदसंधारणची सुमारे 9 हजार 900 कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी महाजन यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.