प्रा.राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने पांढरेवाडी साठवण तलाव योजनेला प्रशासकीय मान्यता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने जामखेड तालुक्यातील मौजे पांढरेवाडी साठवण तलाव योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेसाठी 1 कोटी, 69 लाख, 49 हजार, 180 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभागाने पारीत केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या संदर्भात लघुसिंचन (जलसंधारण) विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मौजे पांढरेवाडी साठवण तलावाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. 37 हेक्टर इतकी सिंचन क्षमता असणाऱ्या साठवण तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येणार आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानुसार प्रशासकीय मान्यतेसाठी ही बाब शासनस्तरावर विचाराधीन होती. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन मृद व जलसंधारण विभागास या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. शासनाने नुकतेच या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन आदेश जारी केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.