पोलिसांसमोरच महिलेचा खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
स्वाती महेश बंडगे (रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला प्रसुतीसाठी माहेरी मांजरसुंबा गड येथे आली होती. काही वर्षापूर्वी तिचे लग्न शिर्डी येथील भोंडगे परिवार झाले होते. महिनाभरापूर्वी ती मांजरसुंबा गड येथे प्रसुतीसाठी आली होती. पाच दिवसापूर्वी तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. तिचे माहेरचे नाव स्वाती तुकाराम वाघमारे असे आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
ती आत्महत्या करण्यासाठी गडावरील एका टेकडीवर गेली होती. ही माहिती गावातील लोकांना समजताच लोकांनी पोलिसांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली़ एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.