धुमस्टाईलने गंठण चोरी करणारी टोळी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत महिलांचे गंठण धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या ७ जणांची टोळी नगर तालुक्यातील शहापूर गावच्या शिवारातून जेरबंद करण्याची कारवाई केली असून यामध्ये ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तर ४ जण पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. या आरोपींनी एकूण २३ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ९ लाख रूपये किंमतीचे ३० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपींकडून सोने खरेदी करणारा श्रीरामपूर परिसरातील सराफ पोलिसांच्या रडार असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-पाथर्डी रोडवर शहापूर शिवारात ८ ते १० अनोळखी इसम हे दरोडा घालण्याच्या तयारीत बसलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यानूसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने शहापूर गावच्या शिवारात सापळा लावला. गावच्या शिवारातील पेट्रोल पंपाजवळ सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर आले असता नगर ते पाथर्डी जाणाऱ्या रोडच्या वळणावर उजव्या बाजूस काही इसम चार मोटारसायकलवर बसलेले असल्याचे दिसून आले. 

पथकातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याजवळ जात असताना त्यांना पथकाची चाहूल लागताच ते इसम तेथून मोटारसायकलवर बसून पाथर्डीच्या दिशेने पळून गेले व आजूबाजूला दबा धरुन बसलेले त्यांचे साथीदार पायी पळू लागले. तेव्हा पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.