विरोधकांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी : राठोड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहराच्या विकासात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. नागरिकांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे तत्पर आहेत. परंतु आज विरोधी नगरसेवक हे ज्या भागात गरज नाही, त्या भागात कामे करुन नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. परंतु सेनेचे नगरसेवक हे आवश्यक त्या ठिकाणी कामे करुन जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा पुरवित आहेत. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मनपाची आर्थिकस्थिती नाजूक असली तरी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य राहील. शहरातील मुलभुत सुविधांबरोबरच शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुनिता मुदगल यांच्या प्रयत्नातून व महापौर सुरेखा कदम यांच्या विकास निधीतून प्रभाग २२ मधील तांगेगल्ली ते नेप्तीगेट मंदिर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे लोकापर्ण श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, महिला बालकल्याण सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनिता मुदगल, सभागृहनेते गणेश कवडे, नगरसेवक संजय शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, दत्ता मुदगल, बाबासाहेब वाळके, शुभम श्रीगादी, गणेश सोनवणे, देवराम गोरे आदि उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना महापौर कदम म्हणाल्या, आज प्रत्येक भागातील महापौर निधीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी पुरविण्यात येत असून, प्रत्येक भागातील नागरिकांच्या पाणी, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज या मुलभूत सुविधांबरोबरच उद्याने, चौक सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शहराच्या विकासात भर पडत आहे. प्रभागाचा विकास करतांना त्याचा शहराच्या सौंदर्यात भर पडेल अशाच प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत.

याप्रसंगी उपसभापती मुदगल म्हणाल्या, प्रभागातील प्रत्येक भागात सुविधा पुरविण्याकडे आपण लक्ष देत असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक भागातील कामे मार्गी लागत आहेत. नागरीकांना मुलभूत सुविधा मिळण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये, याकडे आपले विशेष लक्ष असते. प्रभागाच्या विविध भागातील कामांसाठी मनपाकडे प्रस्ताव दिले आहेत, लवकरच आणखी विकास कामे होतील, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.