कोल्हार खुर्दमध्ये अडीच एकर ऊस जळून खाक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कोल्हार खुर्द शिवारात काल अचानक लागलेल्या आगीमुळे गळीतास उभा असलेल्या अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. कोल्हार खुर्द -रामपूर रस्त्यालगत बापूसाहेब रावसाहेब खर्डे यांची शेती आहे. त्यामध्ये अडीच एकर ऊस कारखान्यास तुटून जाणार होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
परंतु काल दुपारी अचानक लागलेल्या आगीत हा ऊस पूर्णपणे जळून गेला. साधारण अंदाजे पाच लाख रुपये नुकसान झाल्याचे या शेतकऱ्याने म्हटले असून आगीचे कारण मात्र समजले नाही. सदरच्या शेतकऱ्यांना आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विखे कारखान्याच्या अग्निशमन दलाशी संपर्क केल्यानंतर अग्निशमन बंब येईपर्यंत ऊस जळून खाक झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.