छेड काढणाऱ्या दोघा 'रोडरोमिओं'ची सिनेस्टाईल धुलाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील वडगावपानफाटा येथील शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन परिसरात धुमस्टाईलने मोटारसायकल चालवून विद्याथीर्नींना त्रास देत छेड काढणाऱ्या दोघा रोडरोमिओंची सिनेस्टाईल धुलाई करण्यात आली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने रोडरोमिओ चांगलेच धास्तावले. सिनेस्टाईल धुलाई केलेल्या दोघाही रोडरोमिओंना ग्रामस्थांनी अखेर पोलिसांच्या हवाली केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना त्रास देण्याचे व छेड काढण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. मर्यादेपोटी विद्यार्थिनी तक्रार करीत नाहीत. त्याचा फायदा 'टुकारगिरी' करणारे घेत आहेत. आपले दिवटे गावात काय करतात, याची खबर त्याच्या आई - वडिलांना नसते.

शाळा सुटल्यावर धुमस्टाईलने मोटारसायकल चालवून शिट्या मारीत विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रकार वडगावपान फाटा परिसरात सुरु होता. हा प्रकार स्थानिक युवक व पदाधिकाऱ्यांच्या कानावर काही विद्यार्थिनींनी घातला. त्यांनी पाळत ठेवून सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोकणगाव येथील १९ व २० वर्षे वयाच्या दोघा रोडरोमिओंना मोटारसायकलसह पकडले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जमलेल्या जमावाने त्यांना सिनेस्टाईल यथेच्छ चोप दिला. याबाबत काहींनी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी दोघाही रोडरोमिओंना संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली दिले. 

हा प्रकार बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना असाच धडा शिकविला जाईल, असे एका स्थानिक युवकाने घटनेची माहिती देताना सांगितले. या प्रकाराने रोडरोमिओ चांगलेच धास्तावले असून घडल्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.