पालकमंत्री राम शिंदेंसह भाजपकडून सुडाचे राजकारण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडवल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत केली जाणारी ग्रामीण भागातील विविध विकास कामे महिन्यांपासून ठप्प आहेत. पालकमंत्री आणि भाजपकडून जिल्हा परिषदेत जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे. यात जनता भरडली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तालुक्यातील सारोळा कासार येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकासकामांची उद्घाटने प्रभावी कामे करणाऱ्या लोकसेवकांचा सत्कार माजी अामदार दादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास हराळ, शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख नीलेश लंके, खडकीचे सरपंच प्रवीण कोठुळे,बाबुर्डी घुमटचे सरपंच जनार्दन माने उपस्थित होते. यावेळी कार्ले यांनी भाजपवर आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्र सोडले.

भाजप सरकारने जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवताना किचकट अटी लावून अडचणी निर्माण केल्या आहेत. ३० टक्के निधीला कात्री लावली आणि उर्वरित ७० टक्के निधी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा घेवून अडवला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. परंतु या जिरवाजिरावीमध्ये विकास कामे ठप्प झाल्याने सर्व सामान्य जनता भरडली जात आहे,असा आरोप केला. आम्ही जनतेसाठी रात्रंदिवस कामे करतो,आंदोलने करतो म्हणून जनता पाठीशी असल्याचे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.