नगरमध्ये उद्योजकाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहरातील उद्योजकाने रविवारी (दि. १७) गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकातील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या उद्योजकाच्या खिशात मृत्यूपुर्वी लिहलेली एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीतून हा प्रकार कशामुळे घडला याचा तपास लागणार आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उद्योजक बलराज आत्माराम बठेजा (वय ५८) यांनी रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील पारिजात चौकातील इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली.

 बठेजा यांच्या खिशात आत्महत्येपुर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी कुटुंबियांनी फिर्याद दाखल केल्यानंतर हा प्रकार नेमका कशामुळे घडला ते स्पष्ट होईल. दरम्यान, याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बठेजा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून त्यांचा प्लायवूड पुरविण्याचा व्यवसाय होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.