पारनेर पंचायत समितीमध्ये सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही दिनी ठिय्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिका-यांना धारेवर धरले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या़ विहिरीची प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विहिरीची प्रकरणे मंजूर करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकारी टक्केवारी मागतात, असा आरोप आंदोलकांनी केला़ याबाबत गटविकास अधिका-यांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही, असेही काही शेतक-यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.