'पियुश शुगर'समोर उस उत्पादकांचे आंदोलन नेवासा तालुक्यातील शेतकरी आक्रमक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप नेवासा तालुक्यातील उस उत्पादकांनी केला आहे. याच्याच निषेधार्थ शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर शेतक-यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत अधिक माहिती देताना शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे म्हणाले की, पाण्याअभावी नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळेच येथील पियुश शुगर हा खासगी साखर कारखाना नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी व पाथर्डी आदी तालुक्यातील उसावर चालविला जातो.

मात्र, यंदा या कारखान्याने मागील वर्षी २५०० रुपयांचा भाव दिला होता. यंदाही मागील वर्षीपेक्षा किमान ५० रुपये जादा भाव देण्याचे आश्वासन देऊन यांनी उस आणला होता. मात्र, आता फक्त २२०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 

तसेच ४८ दिवसांपासूनचे पेमेंचही कारखान्याने जमा केलेले नाही. त्यामुळेच १५ दिवसांत पैसे जमा न करून या कारखान्याने शेतकरी बांधवांची फसवणूक करतानाच सरकारी नियम धाब्यावर बसविला आहे. याच फसवणुकीमुळे साखर संचालनालयाने या कारखान्यावर नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मात्र, सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या वरदहस्ताने चालणा-या या कारखान्यालाच साखर आयुक्तालयाने अभय दिले आहे. सरकारी कृपेने मोकळे रान मिळाल्यानेच हा कारखाना शेतक-यांची पिळवणूक करीत आहे. याविरोधात उग्र आंदोलन पुकारतानाच प्रसंगी गव्हाणीत आत्मदहन करण्याचीही शेतकरी बांधवांची भावना आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या फसवणुकीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी रविंद्र आगळे यांनी केली आहे. यावेळी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, विजय निकम, संदीप लंघे, अनिल पोटे, सतिश पोटे, महेश कदम, दत्तात्रय लांडे, विनोद पोटे, अरुण देशमुख, बाबासाहेब निकम, बाबासाहेब वाकळे, आंबादास घुले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

...तर आंदोलन पेटेल : दहातोंडे
संभाजी दहातोंडे म्हणाले की, शेतक-यांवर अन्याय होत असतानाही सरकार व प्रशासन ढिम्म आहे. परिणामी पियुश शुगर कारखान्याकडून शेतक-यांची लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. यावर तातडीने न्याय न दिल्यास हेच आंदोलन हिंसक होऊन पेटेल. याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील.

कारखान्यावर गुन्हा दाखल करा : चोभे
सचिन चोभे म्हणाले की, कारखाना प्रशासन उतारा कमी येत असल्याचे कारण देऊन लूट करीत आहे. ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच १५ दिवसांत पेमेंटही जमा केलेले नाही. त्यामुळेच याप्रकरणी साखर आयुक्तांनी कमी उतारा येण्याच्या प्रकरणाची चौकशी करतानाच कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.