घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे.विष्णू जाधव हे घासावर मावा पडला म्हणून औषधाची फवारणी करीत होते़ औषध फवारणी करत असताना जाधव यांना चक्कर येऊन ते तेथेच कोसळले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
खूप वेळ झाले तरी ते घरी आले नाही, म्हणून त्यांचे नातेवाईक शेतात त्यांना पाहण्यासाठी आले. त्यावेळी जाधव हे शेतात बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील शेतक-यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात उशीर झाल्याने उपचार सुरू असताना विष्णू जाधव यांचे निधन झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.