गुजरातच्या निकालावर नगर शहरात कोट्यवधी रुपयांचा सट्टा.

दिव्य मराठी अहमदनगर :गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि काँग्रेससाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निकालाबाबत सट्टा बाजार गरम असून त्याचे धागेदोरे नगरपर्यंत पोहोचले आहेत. निकालाबाबत सर्वांना उत्सुकता आहे, तशी सट्टा खेळणाऱ्यांना आहेच. गुजरातच्या निकालावर नगरमध्ये कोटींचा सट्टा लागला आहे.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सट्टा बाजाराने भाजप ४५ पैसे काँग्रेस ५५ पैसे या दरांवरून पलटी घेत नवीन दर जाहीर केले. काँग्रेसला 2 रूपये, तर भाजपसाठी ५५ पैशांचा दर ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होणार असला, तरी सरकार भाजपचेच येईल, असा अंदाज सट्टा बाजारात व्यक्त केला जात आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
विजयाचे दावे भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूने केले जात आहेत. अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपची सरशी दाखवण्यात आली आहे. इंडीया टुडे आणि अक्सीस इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजपला ९९ ते १०६, तर काँग्रेसला ६८ ते ७५ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यनुसार भाजपला १३५, तर काँग्रेसला ४७, तर इंडिया टुडेच्या सर्व्हेनुसार भाजप १०९ काँग्रेस ७० जागांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आले आहेत. सर्व वाहिन्यांचा सार पहाता भाजपला ११७, तर काँग्रेसला ६४ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सट्टाबाजारात ज्याची किंमत जास्त त्याची जिंकण्याची अपेक्षा कमी, तर ज्याची किंमत कमी त्याला संधी जास्त असे ठरलेले असते. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपण्याअगोदर सट्टा बाजारात भाजपला ९२ ते ९४ आणि काँग्रेसला ९० ते ९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. भाजपसाठी ४५ पैसे, तर काँग्रेससाठी ५५ पैसे दर देण्यात आला होता. म्हणजे चुरशीची शक्यता वर्तवली जात होती. पण दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले आणि सट्टा बाजारानेही पलटी घेतली.

सट्टा बाजारातील अंदाजानुसार काँग्रेसला फायदा होणार असला, तरी सरकार भाजपचे येईल.
जागांची तफावत कमी राहण्याची चिन्हे आहेत. भाजपला १०० ते १०३ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला असून काँग्रेसला ७८ ते १०० जागा दाखवण्यात आल्या आहेत. भाजप जर १०३ च्या पुढे गेली, तर लाखाला अधिक ३५ हजार दर आहे. जर भाजप १०० जागांपेक्षा कमी जागा जिंकली, तर लाखाला अधिक एक लाख दर आहे.

काँग्रेस जर ७८ पेक्षा जास्त जागा जिंकली, तर एक लाखाला अधिक ३५ हजार दर जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर चुरस दाखवणारा सट्टा बाजार १४ डिसेंबरच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर घुमजाव करत भाजपच्या बाजूने झुकलेला दिसतो. नगरमध्ये कोट्यवधींच्या लागलेल्या सट्टयामुळे अनेकांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

एक्झिट पोल, सट्टा बाजाराचे अंदाज चुकतातही...
एक्झिटपोल आणि सट्टा बाजाराचे अंदाज अनेक वेळा चुकलेही आहेत. भाजपने लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानंतर लगेचच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वच एक्झिट पोल आणि सट्टा बाजाराचे अंदाज साफ चुकले. बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा या राज्यांतील निवडणुकांमध्येही चुकले होते. यावेळी काय होते याची सट्टा बाजारात उत्सुकता आहे. यावेळी सट्टा बाजाराचे अंदाज बरोबर येतात की चुकतात, यावर नफ्याची गणिते मांडली जात आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.