पर्ल्सच्या गुंतवणूकदारांना संयम ठेवण्याचे प्रतिनिधींचे आवाहन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेची जप्ती करुन, त्याच्या विक्रीद्वारे ग्राहकांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू आहे. असे असताना जिल्ह्यातील कंपनीच्या प्रतिनिधींना ग्राहकांकडून दमबाजी व मानसिक त्रास होत असताना प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेवून चर्चा केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सन १९८३ पासून पर्ल्स कंपनी देशात सुरु झाली. कंपनीत महाराष्ट्रासह देशातील अनेक ग्राहकांनी गुंतवणूक केली. रोजगार मिळण्याच्या हेतूने अनेक प्रतिनिधी या कंपनीशी जोडले गेले. जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी प्रतिनिधींच्या माध्यमातून पैशांची गुंतवणुक केली. सर्वोच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०१६ रोजी कंपनी बंद करण्याचे आदेश दिले. तसेच कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करुन, त्याच्या विक्रीद्वारे गुंतवणूक दारांची देणी देण्याचा हुकुम केला.

सर्वोच्च न्यायालयाने जस्टीस आर.एम. लोढा समितीची नियुक्ती करुन, या समितीच्या नियंत्रणाखाली या कंपनीची स्थावर मालमत्ता विक्रीची प्रक्रिया चालू केली आहे. ही मालमत्ता विक्री करुन गुंतवणूकदार ग्राहकांचे पैसे परत दिले जाणार आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून उच्चस्तरावर हाताळले जात आहे. मात्र स्थानिक गुंतवणुकदार ग्राहकांना याची कल्पना नसल्याने ते प्रतिनिधींना वेठीस करुन मानसिक त्रास देत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
कंपनीत काम करणाऱ्या प्रतिनिधींना देखील गुतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची भावना आहे. या मालमत्तेची विक्री झाल्यास गुंतवणूक दारांना पैसे परत मिळणार असून, गुंतवणूकदारांनी संयम ठेवून, कायदा हातात न घेण्याचे आवाहन कंपनी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना एस. पी. गावडे, ए. डी. अनारसे, ए. एस. गार्डी, आर. एम. गार्डी, आर. बी. बेरड, व्ही. बी. बेरड, पी. के. बेरड, एम. के. पठाण, जे. बी. गवळी, व्ही. ए. सय्यद, एस. एम. गावडे आदींनी हे निवेदन दिले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.