मनपातील सत्ताधाऱ्यांमुळे नगरची राज्यात बदनामी : आमदार जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :'मनपाच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य शासनाकडे नगर शहराची बदनामी झाली आहे. विकासकामात आडकाठी आणणे, अर्ज करणे हा या सत्ताधाऱ्यांच्या धंद्यामुळे मंत्री व सचिवांपुढे एक हसू निर्माण झाले आहे. तरीही आम्ही शासनाकडून निधी आणण्याचे काम करीत आहोत. विकासकामात यांनी आडकाठी आणू नये. त्यामुळे मंत्री व अधिकारी नगरकडे दुर्लक्ष करीत आहोत. परंतु, आमच्या पाठपुराव्यामुळे नगर शहरास विकासनिधी मिळत आहे,' असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगरसेवक विपूल शेटिया व नगरसेविका नंदा साठे यांच्या प्रयत्नातून खालकर हॉस्पिटल परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी स्थायी समिती सभापती मनेष साठे, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, भाऊसाहेब पांडुळे, अभिजीत खोसे, बाबा गाडळकर, डॉ. अतुल खालकर, किरण व्होरा, आनंद नहार, साधना भंडारी, प्रसन्न शिंदे, संतोष पारख, सतीश मिसाळ, नंदप्रकाश शिंदे, कल्पेश कर्नावट, बाबासाहेब भगत, विक'म कराचीवाला, सुनील डाके, विवेक दिवटे उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
जगताप म्हणाले, 'विकासाला नगर शहरातील नागरिकांनी आता हाक दिली आहे. यापूर्वी विकासकामे होत नसल्याने नागरिकही विकासापासून लांब होते.' प्रत्येक भागात विकास कामाची मागणी वाढली आहे. मनपाकडून नगरसेवकांना निधी उपलब्ध होत नाही. यासाठी आम्ही शासनाकडून निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. मनपाकडून विकासाचा अजेंडा बाजूला झाला आहे. महापालिकेत निरंतर नगर सेवा हे ब्रीद वाक्य या सत्ताधाऱ्यांमुळे नुसते नावापुरतेच राहिले आहे. विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.