महिला ग्रामपंचायत सदस्यास मारहाण करत विनयभंग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील धामणगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी महिला ग्रामपंचायत सदस्यास जबरदस्तीने पळवून नेत मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी उपसरपंचासह नऊ जणांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने तालूक्यात खळबळ उडाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतच्या एक महिला सदस्या आपल्या पतीसह शुक्रवार दि. १५ रोजी जेवण करून झोपले असता रात्री दहा वाजता घराबाहेर मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. 

तेव्हा दोघे घराबाहेर आले असता समोरच दोन पांढऱ्या रंगाच्या गाड्या उभ्या दिसल्या व गावातीलच नाना दगडु महारनवर, विश्वनाथ दगडु महारनवर, सतीश शाहू घूमरे, सूरेश शाहु घूमरे, संतोष बापूराव महारनवर (सर्व रा. धामणगाव) यांच्यासह इतर चार अनोळखी माणसं गाडीतून उतरत महिला सदस्याच्या पतीस म्हणाले की, तूमची पत्नी कोठे आहे ? असे म्हणत मारहाण करू लागले. 

महिला सदस्या पतीस सोडवण्यासाठी आले असता संतोष बापूराव महारनवर याने सदर महिलेवर काठी उगारत तू आत्ताच्या आत्ता आमच्या गाडीत बस असे म्हणून ओढू लागला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच हाताला धरून ओढले. तू आमच्या पार्टीकडे आली नाही तर तूझ्याकडे बघून घेतो असा दमही दिला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्याचवेळी वस्तीकडे एक वाहन येत असताना त्याची लाईट दिसल्याने सदरचे सर्व लोक दोन्ही गाड्यासह पळून गेले. थोड्याच वेळात तिथे एक जिप आली त्यातून सरपंच महारूद्र विष्णू महारनवर, पार्वती महारनवर, केशव महारनवर हे महिला सदस्याच्या घरी आले असता त्यांना घडलेली घटना सांगितली. 

तेव्हा सर्वांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार नाना महारनवर, विश्वनाथ महारनवर, सतीश घूमरे, सूरेश घूमरे, संतोष महारनवर यांच्यासह इतर ४ जणांविरोधात मारहाण करून जबरदस्तीने पळवून नेत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

धामणगावच्या राजकीय पटावर तापलेले वातावरण पाहता याचे पडसाद तालुक्याच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.