बाह्यवळण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बळीराजावर संकट!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निंबळक बायपास शिवारात 700 एकर ऊस क्षेत्र असून, बायपास रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बळीराजावर संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील कोणताही कारखाना या शिवारातील ऊस तोडणी करायला तयार नाही. ऊस तोडणी कामगारांनीही ऊस तोडणीला नकार दिला आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याचा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे शिवारातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

निंबळक बायपास शिवारात नालेगाव, निंबळक, बोल्हेगाव हे शिवारातील 700 एकर उसाचे क्षेत्र आहे. साखर कारखान्यांनी बाह्यवळण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऊस तोडणी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या ऐतिहासिक शहरात बायपासच्या दुरवस्थेमुळे आसपासच्या परिसरातील फेसबुक लाइव्ह आंदोलनेही मोठ्या प्रमाणावर केली आहे. 

परंतु, प्रशासनाला काही जाग येत नसल्याचे चित्र दिसत आहे. निंबळक बायपास हा 7 किलो मीटरचा रोड असून, हा 10 मिनिटाचा रोड पार करायला 2 तास वेळ लागतो. सर्व रस्त्याच्या ठिकाणी वाळू बाहेर आली आहे. सर्व ठिकाणी खड्डेच खड्डे दिसत आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाहन चालकांना या रस्त्यानी जाताना मोठी कसरत करावी लागते. राज्यभरात या बायपासमुळे मोठी बदनामी झाली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
शहरातील वाहतूक कमी करण्यासाठी बाह्यवळण रस्ता केला. त्यानुसार पुणे, मनमाड, सोलापूर, कल्याण या मार्गावर जाणारी वाहतूक बाह्यवळण मार्गावर वळविण्यात आली. परंतु, बाह्यवळण रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. हा रस्ता केंद्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही देण्यात आला. परंतु, केंद्र सरकारकडून हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी जाईल. 

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. या रस्त्यासाठी 16 कोटी 50 लाखांची मंजुरीही मिळाली आहे. परंतु, बाह्यवळण रस्ता दुरूतीची निविदाचा अधिकार मंत्रालयाला असल्याने बाह्यवळण रस्ता दुरुस्ती रखडली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.