देशाची सत्ता कोणत्याही एका व्यक्तिच्या हातात एकवटता कामा नये.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशाची अखंडता टिकवून राहण्यासाठी भौगोलिक सलगता ,भाषा ,जाती धर्म यांच्यातील समानता असणे आवश्यक असते. मात्र भारताने या सर्वांच्या विभिन्नतेतही एकता टिकवून जगासमोर आदर्श ठेवला आहे. देश नैतिकतेच्या मुल्यावर भक्कम उभा असल्यामुळे आज पर्यंत दुभंगला गेला नाही. असे प्रतिपादन साम टिव्हीचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पद्मभुषण स्व. खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमीत्त शेवगाव येथील विखे पाटील शैक्षणिक समूहाच्या वतीने काल शनिवार ता. १६ रोजी आयोजीत स्मृति व्याख्यानमालेची सुरुवात आवटे यांच्या भारत नावाच्या देशाची गोष्ट या व्याख्यानाने झाली. 

यावेळी आयुर्वेद महाविदयालयाचे प्राचार्य डाँ. भागवत शिंदे, विखे शैक्षणिक समूहाचे कार्यकारी संचालक युवराज नरवडे पाटील, रेखा नरवडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे,रेसिडेन्शिअल विदयालयाचे प्राचार्य दिलीप फलके, एस.व्ही कुलकर्णी, राजीव रसाळ, श्रीराम धुत, आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शकुंतला माधवराव नरवडे पाटील या होत्या. आवटे म्हणाले की, वाद आणि संवादाची देशाला मोठी परंपरा असून ती हळूहळू लोप पावते की काय अशी अवस्था सध्या निर्माण होत आहे. 

जुन्या पिढीबदल त्यांच्या विचाराबदल नावे ठेवणा-या तरुण पिढीला देशासाठी त्यांचे असलेले योगदान माहित नाही हा देश ज्येष्ठ लोकांनी इतपर्यंत वाहून आणला आहे. याचे कारण त्यांना देशाची मुल्य माहित होती. विचार नसेल आर्थीक समाजिक व समता नसेल तर राजकीय समता कोसळायला वेळ लागत नाही. देशातील नागरीकांच्या सामूहीक शहाणपणावर राजकीय व्यवस्थेचा विश्वास असायला हवा. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
धर्म जात याच्या आधारावर देश कधीही उभा रहात नाही. प्रत्येकाला निश्चीत अशी राजकीय भुमिका असायलाच हवी. लोकशाहीत टिकवण्यासाठी प्रबळ विरोधक नागरीकांकडे विवेक , सविधानिक नैतिकता , आर्थिक समाजिक न्यायाचे तत्व ही चार मुल्य महत्वाचे आहेत. देशाची सत्ता कोणत्याही एका व्यक्तिच्या हातात एकवटता कामा नये. 

अन्यथा देशातील नागरिकांच्या हक्कावर व स्वातंत्र्यावर गदा येवून त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार गमवावा लागेल. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच निवडणुक आयोगासारख्या स्वायत्य संस्थेवर आक्षेप येण्याची ही पहीलीच वेळ आहे. कला विज्ञान महाविदयालयाचे प्राचार्य डाँ. ओंकार रसाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक तर रामदास कातकडे सुत्रसंचालन यांनी केले. तर आभार विलास घुले यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.