जि.प.सदस्य गुलाब तनपुरेंसह १५ जणांवर फसवणूकीचा गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्यासह १५ जणांवर सुमारे साठ लाख रुपयांची अफरातफर करून फसवणूक केल्याचा गुन्हा कर्जत पोलिसांनी नोंदविला आहे. माणिक सोनटक्के (रा. कर्जत) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच काही जण पसार झाले आहेत. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, उमेश विश्वनाथ देवकर (रा. केडगाव, नगर), विशाल रामदास उदमले, मिलिंद मुरलीधर कुलकर्णी, विजय रामेश्वर यादव, सतीश रामदास ढवळे, गणेश महादेव फराटे, बाळासाहेब देवराव भोईटे, कांचन साहेबराव दामोदरे, सुरेखा संभाजी टकले, बाबासाहेब एकनाथ कंक, कल्पना तुषार बुकफोडे, सीमा पंडित कुलकर्णी (सर्व रा. मिरजगाव, ता. कर्जत० यांच्याविरुद्ध संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे यांच्यासह १५ जणांनी संगनमताने मिरजगाव येथील हेरंब सहकारी गृहनिर्माण संस्थेत ही अफरातफर केली आहे. सुमारे ५९ लाख ७० हजार ७९९ रुपयांची ही अफरातफर केली आहे.

या सर्वांनी स्वत: वैयक्तिक फायद्याकरीता २० जानेवारी २००६ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत या गृहनिर्माण संस्थेमध्ये बांधकाम करण्यासाठी ५५ लाख ४५ हजार ७९९ रुपयांची अफरातफर केली आहे. संस्थेच्या मालकीचे असलेले चार प्लॉट (क्रमांक ११, १२, १६ व २०) यांची परस्पर विक्री केली आहे. सहकार दराने याची किंमत सुमारे ४ लाख २७ हजार नोंदणी दस्तावेंजाचा एकूण ५७ लाख ७० हजार ७९९ रुपयांचा अपहार केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.