नगर-पुणे रेल्वे सुरू होणार, लवकरच होणार चाचणी; नगरकरांच्या प्रयत्नांना यश

दैनिक दिव्य मराठी :नगरहून पुण्याला थेट रेल्वे सुरू करण्याची नगरकरांची मागणी अखेर लवकरच पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहेत. नगर-पुणे रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून नगरकरांनी लावलेला रेटा खासदार दिलीप गांधी यांचे प्रयत्न यांमुळे ही रेल्वे दृष्टिपथात आली आहे. लवकरच तिची चाचणीही होणार असल्याची माहिती समजली. ‘दिव्य मराठी’ सन २०१२ पासून नगर-पुणे रेल्वेसाठी खास अभियान राबवत आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगर-पुणे रेल्वे कृती समितीने यासाठी सह्यांची मोहीम, तसेच ऑनलाइन याचिका दाखल केली होती. या शिवाय ट्विटरवरून सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्यांची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सध्या नगरहून पुण्याला किती बस त्यातून किती प्रवासी जातात, यांची माहिती घेतली. त्यावरून अशी रेल्वे सुरू करण्याच्या मनस्थितीत रेल्वेचे प्रशासन आले आहे. त्यातूनच लवकरच या रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती समजली. ही गाडी फास्ट पॅसेंजर किंवा इंटरसिटी रेल्वे असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या नगरहून पुण्याला दिवसाला सुमारे ८० हजार लोक ये-जा करीत असतात. दररोज एसटीच्या बसमध्ये धक्के खात, वाहतुकीच्या कोंडीचा मनस्ताप सहन करीत जादा पैसे खर्च करीत नगरकरांचा पुणे ‘अप-डाऊन’ असा प्रवास सुरू आहे. नगर-पुणे थेट रेल्वे सुरू झाल्यास नगरकरांची सोय तर होईलच, पण नगरच्या विकासास नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. नगरमधील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहतात. त्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागतो. थेट नगर-पुणे रेल्वे सुरू होणार आहे. सध्या तीन कॉड लाइन पूर्ण झाल्यानंतर सव्वादोन तासांत ते पुण्यात पोचू शकतील. त्यामुळे त्यांना पुण्यात रहावे लागणार नाही. अगदी मराठवाड्यातील जनता नगरपर्यंत बसने येऊन येथून रेल्वेने लवकर पुणे मुंबईला जाऊ शकेल. दौंड-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर हा वेळ आणखी कमी होणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नगरहून पुण्याला १२० किलोमीटरसाठी बसने वाहतुकीच्या प्रमाणानुसार तीन ते चार तास लागतात. सध्या हा महामार्ग चौपदरी आहे. त्यावरील वाहतुकीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने हा मार्गही कमी पडत आहे. त्यात पुण्यातील शेवटच्या वीस किलोमीटरच्या टप्प्याला तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे प्रवासी कंटाळून जातात. रेल्वेमार्गाने हेच अंतर सध्या १६० किलोमीटर होते. त्यासाठी सध्याचा लागणारा वेळ तीन तास आहे. कॉड लाइन झाल्यानंतर अंतर वेळही कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वेची ही सेवा नगर-पुणे प्रवासातील एक प्रकारची क्रांती ठरणार असल्याचे मत या रेल्वेसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या नगर-पुणे रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले.

नगर-पुणे प्रवासाची स्थिती
नगरहून दररोज एसटीच्या सर्व मिळून सुमारे ६५५ बस पुण्याला जातात. या शिवाय पुण्यामार्गे मुंबईला जाणाऱ्या ६५ बस (यात चाकण कल्याण मार्गे जाणाऱ्या बसचा समावेश नाही) स्वारगेटला ३५ बस जातात. एकूण ७५५ बस नगरहून पुण्याला जातात. त्यातील २१० बस फक्त नगर-पुणे दरम्यानच्या आहेत. या शिवाय दिवसभरात शंभराहून अधिक खासगी ट्रॅव्हल जीपही नगर-पुणे दरम्यान प्रवासी वाहतूक करीत असतात. सर्व मिळून नगरचे सुमारे ४० हजार लोक पुण्याला जातात. दर शनिवार, रविवार सोमवारी बसमध्ये बसण्यासही नगरकरांना जागा मिळत नाही, अशी स्थिती असते. नगर-पुणे रेल्वे झाल्यास यांपैकी अनेक प्रवासी रेल्वेकडे वळून एसटीवरचा, तसेच रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होऊ शकतो.

सर्वांच्या प्रयत्नांना यश
सर्वलोकप्रतिनिधींनाबरोबर घेऊन सनदशीर मार्गाने आग्रही मांडणी, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची आश्वासक भूमिका, खासदार गांधी यांचा पाठपुरावा, त्यामुळे ही रेल्वे लवकरच सुरू होण्याची शक्यता वाटते.
- हरजितसिंग वधवा, अध्यक्ष, नगर-पुणे रेल्वे कृती समिती.

एसटी रेल्वे भाडे फरक
एसटी: साधी बस : १३०. एशियाड : १८०, व्हॉल्व्हो (शिवनेरी) : ३४१ रुपये
रेल्वे : पॅसेंजर : ३५ रुपये, मेल-एक्स्प्रेस (सेकंड क्लास) : ७० रुपये (सुपर फास्ट रेल्वे : ८० रुपये ) एसी थ्री टायर : ३७५ रुपये. इंटर सिटी असेल, तर अवघे ३५ रुपये तिकीट असेल. एसी चेअर कारचे तिकीट २०० रुपये असेल रिझर्व्हेशनसह दुसऱ्या वर्गाचे (फक्त सिट) तिकीट ८५ रुपये असेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.