अनाथ आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मारून टाकण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहिणीकडे राहणाऱ्या एका अनाथ, अल्पवयीन आदिवासी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील सांगवी दुमाला येथे घडली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लखनकुमार काकडे (सांगवी दुमाला) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
फिर्यादीत म्हटले आहे की, २६ नोव्हेंबर रोजी दाजीच्या शेतात गवत काढत असताना आरोपी लखनकुमार काकडे (सांगवी दुमाला) याने पिडीत मुलीवर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीने पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

दरम्यान, पुढील शिक्षणासाठी तिचा श्रीगोंदे शहरातील एका शासकीय हॉस्टेलला नंबर लागल्याने ती हॉस्टेलवर राहून पुढील शिक्षण करत होती. मात्र १२ डिसेंबर रोजी सकाळी नऊच्यासुमारास हॉस्टेलवरून महाविद्यालयात जात असताना लखनकुमार काकडे हा तेथे आला आणि महादेवाच्या मंदिराजवळ तिला अडवून मोटारसायकलवर बसण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्याने काकडे याने तुझे आई-बाप मारले तसे तुलाही मारून टाकण्याची धमकी दिली.

हा प्रकार मुलीने तिच्या बहिणीला आणि दाजीला सांगितला. तिच्या बहिणीने आणि दाजींनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदवली. त्यानुसार लखनकुमार काकडवर अॅट्रासिटी, बलात्कार बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक निरीक्षक नीलेश कांबळे यांनी भेट देऊन आरोपीस अटक केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.