१७ वे पाथर्डी साहित्य संमेलन २३ व २४ डिसेंबरला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पाथर्डी येथे सातत्याने भरणारे ' १७ वे पाथर्डी साहित्य संमेलन यावर्षी दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने पाथर्डी व परिसरातील साहित्य प्रेमींना वैचारिक मेजवानी मिळणार आहे. शहरातील भगवाननगर येथे भरणार्‍या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व तालुक्याचे भूमिपुत्र डाॅ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आलेली आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगर येथील कवी व तहसीलदार गणेश मरकड हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. तर पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव शेवाळे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. अशी माहिती पाथर्डी साहित्य मित्र मंडळाचे अध्यक्ष शाहिर भारत गाडेकर व सचिव वसंतराव बोर्डे यांनी दिली. 

यापूर्वी सातत्याने भरलेल्या सोळा साहित्य संमेलनामुळे 'पाथर्डी साहित्य संमेलन 'राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचलेले आहे. कवी प्रकाश घोडके, लहू कानडे,अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे , स्व. शंकर बडे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, इंद्रजित भालेराव, मनोहर जाधव या सारख्यांची सकस अध्यक्षीय परंपरा या साहित्य संमेलनाला लाभलेली आहे.
शनिवार दिनांक २३ रोजी सायंकाळी सहा वाजता साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात कवी नागेश शेलार, संगीता होळकर -औटे , इंद्रकुमार झांजे हे कवी उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाबा बँडवाले, अॅड. अंकुश गर्जे, शिवाजी पवार, शशिकांत गायकवाड, पोपटशेठ गुगळे, मीना बांगर, सुनिल कटारिया, विमलताई पाठक आणि वृद्धेश्र्वर कावरे या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना 'पार्थभूषण 'सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटक व संमेलनाध्यक्षांची भाषणे होतील. उद्घाटन सत्रास नगराध्यक्ष डाॅ. मृत्युंजय गर्जे,पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड ,सामाजिक कार्यकर्ते डाॅ. दीपक देशमुख, सुरेश मिसाळ हे प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर सायंकाळी ९ वाजता हितगुज कार्यक्रमात रसिक वाचक पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता चित्रकला स्पर्धा आणि नऊ वाजता एकनाथ ढोले सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्जनशील विद्यार्थ्यांचे नाट्यवाचन, कविता गायन आणि कथाकथन होणार आहे दुपारी तीन वाजता विद्यार्थी वक्त्यांची स्पर्धात्मक भाषणे होणार आहेत. साडेचार वाजता खुले कविसंमेलन रंगणार असून यायावेळी उपस्थित सर्व कवी कविता सादर करणार आहेत.
सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमास शब्दगंधचे सुनील गोसावी व पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात लक्ष्मण खेडकर, ग. भि. बळीद, आनंदा साळवे, अर्जून देशमुख, शर्मीला गोसावी, मनिषा गायकवाड, ज्योती आधाट,देवीदास शिंदे, अंबादास बडे या कवींच्या कविता ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात पुढिल मान्यवरांना त्या त्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल 'पार्थभूषण 'पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

 मा. प्रयागा बडे (शिक्षण), प्रा. रमेश मोरगावकर (क्रिडा), डाॅ. भाऊसाहेब लांडे (आरोग्य ),उषाताई वाघमारे(सामाजिक ),भाऊसाहेब ढोले (स्पर्धा परीक्षा ),प्रा. दिलीप सरसे(साहित्य , प्रा. गोरक्ष शिरसाठ (शिक्षण),प्रा. लक्ष्मणराव सत्रे (शिक्षण ).समारोपाच्या कार्यक्रमानंतर विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अंबादास साठे, भाऊसाहेब गोरे, प्रा. अशोक व्यवहारे, गणेश तुपे, बबनराव भगत, रवींद्र दारके, प्रा. रमेश बाहेती सर, रमेश वाधवणे, मेहरून्नीसा पटेल, हाजी हुमायुन आतार, वसंतराव बोर्डे व शाहिर भारत गाडेकर प्रयत्न करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.