चिचोंडीत तरुणाला दारू पाजून विहिरीत ढकलून देवून खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जमीन विक्रीचे १० हजार रुपये द्यावेत, यासाठी मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे घडली. पैशासाठी मित्राला दारु पाजून त्याला विहिरीत ढकलून देवून त्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.१५) उघडकीस आली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संदीप गजानन गायकवाड (वय २७, रा.चिचोंडी पाटील) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयताचा भाऊ श्रीकांत गजानन गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिसांनी तात्या रामराव पवार, अंबादास बबन कोकाटे, अण्णा बापू पांडुळे, विठ्ठल सर्जेराव ठोंबरे आणि झांबरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी फिर्यादीनुसार दिलेली माहिती अशी की, संदीप गायकवाड याचे पाचही आरोपी मित्र आहेत. जमीन विक्रीचे १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी मित्रांकडून करण्यात आली. १० हजार रुपयांसाठी आरोपी तात्या रामराव पवार, अंबादास बबन कोकाटे, अण्णा बापू पांडुळे, विठ्ठल सर्जेराव ठोंबरे आणि झांबरे यांनी कट-कारस्थान रचून गायकवाड यास शेतामध्ये नेले. तेथे आरोपी व गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तद्नंतर आरोपींनी गायकवाड यास दारु पाजून विहिरीत ढकलून ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ही घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी सुरुवातीला नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मयताचा भाऊ श्रीकांत गजानन गायकवाड यांनी १५ डिसेंबर रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.