आर्थिक विवंचनेतून वाहन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आर्थिक विवंचनेतून वाहन चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. राहुरी तालुक्‍यातील कुरणवाडी येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. शिवाजी बाळाजी खिलारी (वय 45) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
घरापासून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांनी गळफास घेतलेल्या शिवाजी यांना पाहिल्याने घरातील लोकांना खबर दिली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवाजी हे खाजगी वाहनावर चालक होते. व्यवसायासाठी त्यांनी नुकताच एक पिकअप टेम्पो घेतला होता. वित्तीय संस्थांच्या कर्जामुळे ते हवालदिल झाले होते. त्यातून नैराश्‍य येऊनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.