खा.गांधींमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला - ना.विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काँग्रेस अध्‍यक्षपदाची सूत्रे खा. राहुल गांधी यांनी स्वीकारल्‍यामुळे देशभरातील लाखो कार्यकर्त्यांचा आत्‍मविश्‍वास वाढला असून, त्यांच्‍या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि पक्षाची वाटचाल नव्‍या उमेदीने पुढे जाईल, असा विश्‍वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्‍यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी नवी दिल्‍ली येथील १० जनपथ येथे खा.राहुल गांधी यांची भेट घेऊन त्‍यांचे अभिनंदन केले. यानंतर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना, विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील म्हणाले की, पक्षाच्‍या अध्यक्षपदाची सुत्रे खा. राहुल गांधी यांनी स्वीकारल्‍याचा मनस्‍वी आनंद देशभरातील लाखो कॉँग्रेस कार्यकर्त्यांना झाला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पक्षाच्‍या दृष्‍टीने हा अतिशय आनंददायी क्षण आहे. खा. राहुल गांधी एक खंबीर नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मजबुती देण्यासाठी ते देशभर फिरत आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, दलित, आदिवासी, अल्पसंख्यक आदी समाजघटकांबाबत ते कमालीचे संवेदनशील असून, याच घटकांना केंद्रीभूत ठेवून ते काम करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील उपेक्षीत, मागास व वंचित घटकांचा आवाज अधिक बुलंद होईल.

खा. राहुल गांधी यांच्या कार्यकाळात पक्ष संघटना अधिक सक्षमपणे बळकट होईल, पक्षाची वाटचाल नव्‍या उमेदीने पुढे जाईल. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खा. राहुल गांधी यांनी सुत्र हाती घेतल्‍यानंतर नवा आत्‍मविश्‍वास पक्षसंघटनेत निर्माण झाला आहे. देशातील तरूणाईमध्ये उत्साह संचारला असून, कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळाल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.