‘प्रसाद शुगर’तर्फे २ हजार ३०० रुपये पहिला हप्ता : नगराध्यक्ष तनपुरे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे असलेल्या प्रसाद शुगर अँण्ड अलाईड अँग्रो या कारखान्याने चालू गळीत हंगाम ३० नोव्हेंबर २०१७ अखेर गळितास आलेल्या ऊसाला प्रथम अँडव्हान्स २ हजार ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे ऊस उत्पादकांना अदा केला आहे. प्रसाद शुगरचा गळीत शुभारंभ दि.२६ रोजी होऊन प्रत्यक्षात गाळपास दि.४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------

दि.४/११/२०१७ ते ३०/११/२०१७ अखेर गाळपास आलेल्या ऊसाला २ हजार ३०० रुपयेप्रमाणे पहिला हप्ता १ हजार ८२४ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग केले आहे. तसेच उत्पादकांनी ऊस दिल्यापासून ७ दिवसांच्या आत पेमेंट उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन कारखाना करीत आहे, अशी माहिती प्रसाद शुगरचे चेअरमन तथा राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

ते म्हणाले, की कारखान्याच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसाद शुगरकडे ऊस उत्पादकांचा ऊस देण्याचा ओढा वाढत आहे. सन २०१७-१८ हंगामात गळीतास ऊस पुरविणा-या ऊस उत्पादलकांना जिल्ह्यातील इतर कारखाने जो अंतिम दर देतील, त्याप्रमाणे ऊस दर देण्याची कारखाना व्यवस्थापनाने हमी दिली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याप्रमाणे त्याचे काटेकोरपणे पालन करून कारखाना व्यवस्थापनाने पहिला हप्ता २ हज़ार ३०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे अदा केला आहे. कारखान्याचा सन २०१७-१८ चा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरु असल्याने ४. ५० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट लवकरच ‘प्रसाद शुगर’ पूर्ण करील, असेही ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.