१२५ हून अधिक शेळ्या विषबाधेमुळे दगावल्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील ढोकरी येथील अंबिकानगर भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या १२५ हून अधिक शेळ्या गत तीन आठवड्यात विषबाधेमुळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. यामुळे सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे आदिवासींचे नुकसान झाले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ढोकरी येथील अंबिकानगर भागात आदिवासी समाजाचे लोक वास्तव्यास असून उदरनिर्वाहासाठी शेळीपालन व्यवसाय करतात. गेल्या तीन आठवड्यापासून या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेळ्या मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू न शकल्याने हे आदिवासी चिंतेत आहेत. पशु वैद्यकीय विभागाला कळवूनही त्यांनी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप या आदिवासींनी केला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रघुनाथ जयतु पथवे यांच्या ४, परबत विठोबा पथवे यांची १ तर संतू बुधा पथवे १, गिताबाई भागा पथवे २, दारकू लक्ष्मण पथवे ३, धोंडिबा आबा पथवे ८, नामदेव गजाबा पथवे २५, पंढरी पुना मेंगाळ ४०, मारुती वाळीबा पथवे २, शांताराम किसन पथवे १, रामा किसन पथवे १, जयवंताबाई गोविंद मेंगाळ १२, लक्ष्मीबाई बन्सू उघडे यांच्या १२ अशा एकूण १२५ हून अधिक शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाला याची माहिती कळविण्यात आली. मात्र तिकडे कुणीही फिरकले नसल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.