अल्पवयीन मुलीवर मेहुण्याचा अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या बहिणीच्या नवऱ्यानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या बहिणीनेच आरोपी पतीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पोलिसांच्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथील कुटुंब ऊसतोडणीसाठी करमाळा तालुक्यातील चिकलठाणा येथे गेले होते. पीडित मुलगीही त्यांच्यासोबत गेली होती. तसेच तिची मोठी बहिणही चिकलठाणा येथे गेली होती. तिच्यासोबत पती दत्ता काळेही होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ते ऊसतोडणीच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या एका झोपडीत राहतात. १३ डिसेंबरला ती आजारी असलेल्या मुलीला उपचारासाठी जामखेड येथे रुग्णालयात आली होती. त्याचवेळी नऊ वर्षांच्या बहिणीला चिकलठाणा येथे दत्ताकडे सोडले होते. झोपडीत कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन दत्ताने तिच्यावर अत्याचार केले. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. संध्याकाळी दत्ताची पत्नी घरी परतली. त्यावेळी पीडितेने घडलेला प्रकार तिला सांगितला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.