खड्डेमय रस्ते व मला पंख असते तर... विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात सध्या सर्वत्र खड्डेमय रस्त्याची समस्या सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी चांगले सुस्थितीतील रस्ते असावेत, अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र नगर शहरात विविध कारणांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशावेळी मला पंख असते तर बरे झाले असते, असे प्रत्येकाला मनोमन वाटते. याच अनुशंगाने जय आनंद महावीर युवक मंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'खड्डेमय रस्ते व मला पंख असते तर..' या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव सत्येन मुथा यांनी दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
खड्डयातून वाट काढताना होणारा त्रास, वाहनांचे होणारे नुकसान, वाहतूक कोंडी अशा समस्यांकडे शालेय विद्यार्थी कशा पध्दतीने पाहतात, त्यांना काय सांगावे वाटते हे जाणून घेण्यासाठी मंडळाने या निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगर अर्बन बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांनी दिली. इयत्ता चौथी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी इयत्ता ४ थी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १२ वी असे दोन गट असणार आहेत. निबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत असावेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निबंधासाठी ५०० शब्दांची मर्यादा आहे. निबंध विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत नवीपेठ येथील रोहित कॉस्मेटिक्स येथे सादर करावयाचे आहेत. स्पर्धेतील दोन्ही गटांसाठी प्रथम तीन क्रमांक व २ उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार असल्याचे मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती गुंदेचा व सचिव वृषाली राका यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.