शिर्डी नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक ताराचंद कोते, हाजी बिलाल शेख यांनी वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्याने आपल्या पदाचे राजीनामे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंडळास दहा जागा मिळाल्याने विखे गटाकडे सत्ता गेली. संख्याबळाच्या आधारावर दोन स्विकृत नगरसेवक सत्ताधारी गटास मिळाले होते.

दरवर्षी एकास स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे वचन त्यांनी दिले होते. प्रथम वर्षीचे स्वीकृत नगरसेवकपदी ताराचंद कोते, बिलाल शेख यांना संधी देण्यात आली. दोन्ही नगरसेवकांचा वर्षभराचा कालावधी संपल्याने त्यांनी शुक्रवार दि. १५ रोजी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.

याबाबत नगरसेवक ताराचंद कोते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ठरल्यानुसार वर्षभराचा कालावधी संपल्याने दिलेल्या शब्दाचा मान राखत या पदाचा राजीनामा दिला आहे. मला विखे परिवारामुळे काम करण्याची संधी मिळाली त्यांचा आभारी आहे. यापुढे कार्यकर्ता म्हणून ना. विखे, डॉ. विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेख यांनी सांगितले की, नगरपंचायतच्या माध्यमातून समाजहिताचे काम करताना मला नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच सर्व सहकारी नगरसेवक व मुख्याधिकारींसह प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची साथ मिळाली. विखे परिवाराने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी वर्षभरात पूर्ण केली असून वर्षपूर्ती झाल्याने दिलेल्या वचनाप्रमाणे पदाचा राजीनामा देत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.